अंगाला घामाचा वास येतोय का? ही आहेत कारणे आणि करा हे उपाय

 तुम्ही बऱ्याचदा पाहिला असेल की उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला सर्वात जास्त घाम येतो. वातावरणातील आद्रता आणि दमटपणा यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात घाम येतो. शरीरावरील घामाला एक वेगळ्याच प्रकारची दुर्गंधी असते ज्यामुळे बऱ्याच आपल्याला इतरांसमोर लाजिरवाणे वाटते अशा गोष्टी टाळण्यासाठी बऱ्याचदा लोक परफ्युम व इतर सुगंधी द्रव्यांचा वापर करतात. परंतु अनेक जणांना अशा गोष्टींची एलर्जी असते ते लोक घरगुती उपायांचा वापर करू शकतात.


Women clossing her nose to avoid sweat odor


अंगाला घाम का येतो?

आपल्या शरीराचे सामान्य तापमान हे ३७ डिग्री सेल्सिअस म्हणजेच ९८.६ F इतके असते. त्यावरील तापमान तापाचे म्हणजेच आजाराचे लक्षण असू शकते.


घाम पुसताना माणूस


शरीराचे तापमान नियंत्रित रहावे यासाठी अंगाला घाम येतो.

आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावर  घामग्रंथी असतात त्यातून थेंबरुपी घाम शरीराबाहेर पडत असतो.  या घामामध्ये अमोनिया, युरिया, मीठ आणि साखर इत्यादी घटक असतात. ऋतूनुसार वातावरणातील तापमान सतत कमी जास्त होत असते याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होतो. 

उष्णता, व्यायाम, कामाचे स्वरूप आणि तणाव यामुळे आपल्याला घाम येऊ शकतो.त्यामुळे शरीराच्या तापमानाचे नियमन करण्यासाठी आपल्या शरीरातून घाम येतो. घाम येणे ही शरीरासाठी एक फायदेशीर गोष्ट आहे कारण घामामुळेच आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते.


घाम येण्याचे फायदे

संशोधनाने घामाचे काही फायदे सिद्ध केले आहे. घाम आल्यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते तसेच इलेक्ट्रोलाईट आणि आम्ल बेस (pH) यांचा देखील समतोल साधला जातो.

त्याचप्रमाणे त्वचेचे हायड्रेशन, डिटॉक्सिफिकेशन, व त्वचेला संक्रमणापासून प्रतिबंध करणे असे इतर फायदे देखील घाम येण्याचे असू शकतात. 


घामाला वास का येतो?

मूळतः घामाला कोणत्याच प्रकारचा वास नसतो परंतु जेव्हा हा घाम शरीरावरील बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो तेव्हा त्यामध्ये दुर्गंधी निर्माण होते.


नाक दाबणारा माणूस


त्याचप्रमाणे आपल्या आहारातील काही घटक देखील शरीरातील दुर्गंधीला कारणीभूत असतात जे रक्तामध्ये मिसळतात व घामाद्वारे बाहेर पडतात ज्यामुळे घामाला दुर्गंधी येते.

अनुवंशिकता त्याचप्रमाणे शरीराची स्वच्छता न राखणे अशा गोष्टी देखील घामाच्या वासाला कारणीभूत असू शकतात.

आपल्या शरीरावरील घामग्रंथींमधून घाम बाहेर पडतो त्यांचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.


घामग्रंथींचे प्रकार:

आपल्या शरीरामध्ये एक्रिन व अपॉक्रीन (apocrine )अशा दोन प्रकारच्या घाम ग्रंथी असतात.


एक्रिन

एक्रिन या ग्रंथी त्वचेवर घाम आणण्याचे काम करतात. या ग्रंथी आपल्या तळव्याचा भाग व्यापत असल्याने बऱ्याच जणांना त्यांच्या हाता पायाच्या तळव्यांना जास्त घाम आल्याचे जाणवते. हा घाम सुकला की त्वचा थंड होते व शरीराचे तापमान देखील नियंत्रित होते आणि घामाला वास देखील येत नाही.


अपॉक्रीन

Apocrine ग्रंथी घाम निर्माण करण्याचे काम करतात व जेव्हा त्या बॅक्टेरियाच्या संपर्कात येतात तेव्हा घामामध्ये दुर्गंधी निर्माण होते. या ग्रंथी काख तसेच जांघेच्या भागात असतात. त्यामुळेच तुम्हाला काखेला खूप वास किंवा दुर्गंधी जाणवते. 

तुम्ही कधी एक गोष्ट नोटीस केलीय का की लहान मुलांच्या घामाला वास येत नाही. Apocrine ग्रंथी या लहान मुलांच्या शरीरामध्ये कार्यरत नसतात हेच कारण आहे की त्यांच्या शरीराला वास येत नाही.


शरीराला दुर्गंधी आणणारे आहारातील घटक.

संशोधनात असे पाहण्यात आले आहे की शाकाहारी व्यक्तीच्या घामापेक्षा मांसाहारी व्यक्तीच्या घामाला जास्त दुर्गंधी असते. 


लसूण, कांदा, अल्कोहोल, ब्रोकोली, कॅफिन


त्याचप्रमाणे आहारामध्ये जर कांदा लसूण ब्रोकोली, कोबी किंवा फ्लॉवर यांचा समावेश असेल तर घामाला दुर्गंधी येऊ शकते.

अल्कोहोल मसालेदार पदार्थ आणि कॅफीन यांच्या सेवनाने देखील घामाला दुर्गंधी येते.


घामाला दुर्गंधी येत असेल तर करा हे उपाय.

शरीराला घाम येणे आणि त्याला वास येणे हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. काहींच्या घामाला सौम्यवास असतो तर काहींच्या घामाला उग्र वास येतो. घरगुती उपायांचा वापर करून हा वास कमी करता येतो.

घरात उपलब्ध असणाऱ्या अनेक वस्तूंचा या तुम्ही उपयोग करू शकता. सेंधव मीठ, ॲपल साइडर विनेगर, लिंबू, बटाटा, टोमॅटो या यापैकी कोणतीही गोष्ट वापरून तुम्ही घामाची दुर्गंधी कमी करू शकतात. पण आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो मी स्वतः वापरला आहे आणि माझ्या जवळच्या लोकांनी देखील वापरून पाहिला आहे ज्याचा त्यांना फायदा झाला. तुम्ही हा उपाय करून पहा आणि शरीराची दुर्गंधी दूर करा. या उपायाने तुम्हाला फरक जाणवल्यास आम्हाला कळवू शकता.


काखेत वास येत असेल तर करा हा पर्याय:

काखेच्या भागामध्ये अपॉक्रीन ग्रंथी असतात त्यामुळे घाम बॅक्टेरियाच्या संपर्कात येऊन काखेमध्ये दुर्गंधी निर्माण होते. यावर एक रामबाण उपाय म्हणजे तुरटीचा वापर करणे.
तुरटीचे तसे अनेक फायदे आहेत आणि त्यातलाच एक फायदा म्हणजे शरीराला घाम येत असल्यास व त्याला वास येत असल्यास याचा उपयोग होतो. तुरटीला फिटकरी असे देखील म्हटले जाते त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये तुरटी चा अर्थ होतो Alum.

केसात कोंडा होत असल्यास देखील तुरटीचा वापर करू शकता त्याचबरोबर केसांची योग्य काळजी घेऊन केस गळती देखील थांबवू शकता.


तुरटी। फिटकरी। Alum



तुरटी वापरण्याची पद्धत

रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकावी तसेच काखेमध्ये तुरटीचा खडा फिरवावा जेणेकरून अतिरिक्त घाम येणार नाही व त्याला वासही येणार नाही.

तुरटी सारखाच सैंधव मीठ हा देखील उत्तम पर्याय आहे.

बऱ्याचदा तुमचा अनुभव असेल की मुले जेव्हा शाळेतून घरी येतात आणि आपले शूज काढतात तेव्हा त्यांच्या पायाला एक वेगळ्याच प्रकारची दुर्गंधी असते. त्याचप्रमाणे मोठ्या व्यक्तींच्या पायाला देखील घाम येतो तेव्हा ते दिवसभर आपल्या पायामध्ये शूज घालून असतात. अशा वेळेस तुम्ही खालील प्रकारे काळजी घेऊ शकता.


पायाला घाम सुटत असेल आणि त्याला वास येत असेल तर करा हे उपाय.

हातात शूज घेऊन महिला व मुलगी


  • जर तुमच्या पायाला दुर्गंधी येत असेल तर पाय नेहमी कोरडे राहतील याची काळजी घ्या.

  • बाहेरून आल्यानंतर तुमचे पाय स्वच्छ धुऊन घ्या पायांच्या बोटांमधील जागा स्वच्छ करा.

  • भांड्यामध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी तुरटी किंवा सेंधव मीठ टाका. 

  • दहा ते पंधरा मिनिटे पाय तसेच पाण्यामध्ये ठेवा.

  • थोड्यावेळाने पाय स्वच्छ कापडाने पुसून कोरडे करा.

त्याचप्रमाणे,

गरज नसल्यास शूज चा वापर कमी करा पण शाळा किंवा नोकरीनिमित्त रोजची गरज असल्यास एक एक्स्ट्रा जोड ठेवा.

रोजचे रोज मोजे धुण्यासाठी टाका.

ओले शूज किंवा मोजे घालू नका.

माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की कळवा तसेच तुमचे अनुभव जीमेलच्या माध्यमातून पाठवू शकता यातील काही अनुभवांचा लेखांमध्ये उल्लेख करण्यात येईल.






 




 


Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post